ग्रामीण भागात एसटी हेच गोरगरीबांचे प्रवासाचे साधन आहे, पण १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संपावर गेलेल्या एक लाखाहून अधिक एसटी कर्मचा-यांच्या संपाबाबत राज्यसरकराने आडमुठे धोरणा स्वीकारल्यामुळे हा संप तीन दिवस चालू आहे.
मुंबई-ग्रामीण भागात एसटी हेच गोरगरीबांचे प्रवासाचे साधन आहे, पण १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संपावर गेलेल्या एक लाखाहून अधिक एसटी कर्मचा-यांच्या संपाबाबत राज्यसरकराने आडमुठे धोरणा स्वीकारल्यामुळे हा संप तीन दिवस चालू आहे. या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी या संपाला आपला संपुर्णत: पाठिंबा व्यक्त केला आहे.
राज्यातील एक लाखाहून अधिक कर्मचारी आपल्या मागण्यासाठी संपावर गेले होते, पण तीन दिवस होऊनही हा संप मिटत नसून अधिकच चिघळत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई राष्ट्रवादी, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी या संपाला आपला संपुर्णत: पाठिंबा व्यक्त केला आहे. सचिन अहिर म्हणाले की, एसटी हे गरीब व मध्यम वर्गीयांचे वाहन आहे, परंतु राज्यपरिवहन तोटय़ात का जाते याचा शोध न घेता शासन सरळसरळ एसटी कर्मचा-यांना सुळावर चढवायला निघाले आहे, तेव्हा मुंबईतील गिरणी कामगार आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेच्या नेतृत्वाखालील सर्व कारखान्यातील कामगार या संपाच्या पाठीमागे ठाम उभे राहून सरकारला धडा शिकवतील, असा इशाराही कामगार नेते सचिन अहिर यांनी यावेळी दिला.
दुस-या दिवशी परेल एसटी आगारासमोर झालेल्या एसटी कामगारांच्या संपाला पाठिंबा देताना रा.मि.म. संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले की, आज एसटी कर्मचा-याला पालिका किंवा शासनाच्या नोकरदारांना मिळणा-या वेतनापेक्षा कमी वेतन मिळत आहे. अवघ्या ९ हजार रूपये अल्पवेतनावर त्यांना समाधान मानावे लागत आहे. एसटी कर्मचा-यांचा हा केवळ संप नव्हे तर आक्रोश आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. खजिनदार निवृत्ती देसाई यांचेही यावेळी भाषण झाले. यावेळी उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, सेक्रेटरी शिवाजी काळे उपस्थित होते. यावेळी एम.एम.सहाणे, के.एन.शिंदे आदी एसटी कर्मचा-यांच्या नेत्यांची यावेळी भाषणे झाली.
या संपात मान्यताप्राप्त महाराष्ट्र स्ट्रेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेबरोबर महाराष्ट्र एसटी वर्कस काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशन, कनिष्ठ वेतन श्रेणी कामगार संघटना, विदर्भ एसटी कामगार संघटना, संघर्ष ग्रुप संघटना सामील झाल्या आहेत. सर्वश्री हनुमंत ताटे, जयप्रकाश छाजेड, मुकेश तिगोटे, शैलेश विश्वकर्मा, राजू भालेराव, अजय कुमार गुजर, शेषराव ढोणे आदी कामगार नेत्यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू आहे, त्याबद्दल त्यांचे कामगार नेते सचिन अहिर यांनी अभिनंदन केले आहे.
[EPSB]
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यास केंद्राने सुरुवात केली असून त्याच्या सहा मालमत्तांचा लिलाव केंद्र सरकार करणार आहे.
[/EPSB]