निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची परवानगी न घेता सोशल मिडीयावर प्रचार केल्याप्रकरणी ३६ उमेदवारांना आचारसंहिता पथक प्रमुखांनी नोटिसा बजावत खुलासा मागवला आहे.
उल्हासनगर- उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची परवानगी न घेता सोशल मिडीयावर प्रचार केल्याप्रकरणी ३६ उमेदवारांना आचारसंहिता पथक प्रमुखांनी नोटिसा बजावत खुलासा मागवला आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराला वेग आला आहे. यंदा पालिकेची बॅनर आणि झेंडे प्रचारासाठी शुल्कासह परवानगी घ्यावी लागत आहे. तसेच अतिरिक्त प्रचार साहित्य वापरल्याप्रकरणी दोन गुन्हे महापालिकेच्या अधिका-यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
यामुळे धास्तावलेल्या उमेदवारांनी साहित्याच्या आधारे प्रचार न करता आपला मोहरा सोशल मिडीयावर वळवला होता. मागील दोन दिवसांत व्हॉटसअॅधप, फेसबुक आदी सोशल मिडीया अॅलपच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू केला होता. ही बाब आचारसंहिता पथकाच्या प्रमुख विजया जाधव यांच्या निदर्शनास येताच या प्रचारकांनी निवडणूक विभागाची परवानगी न घेता प्रचार करण्यास सुरू केल्याने उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यास आली आहे.
या नोटीसमध्ये भारतीय जनता पार्टी व टीम ओमी कलानी यांच्या युडीए महागठबंधनाच्या ओमी कलानी, कुमार आयलानी, जया माखिजा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) गटाचे नाना पवार व त्यांच्या पत्नी पंचशीला पवार, शिवसेनेचे बलबीर सिंग, प्रेरणा आहुजा, मोहिनी भोईर, गणेश शिंगाडे, सुरेश पाटील, मंगला सुरेश पाटील, हरी कनोजिया, सुगंध नथू पगारे, पूजा गोपलानी, राजकुमार चैनानी, रमेश चव्हाण, ज्योती माने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन कदम, विशाल कांबळे, नेहा बाविस्कर, मंगला तातवडेकर, कुसुम कारभारी गोडसे, दिलीप सखाराम थोरात, साई पक्षाचे मोहन रामरख्यानी, दिलीप जग्यासी ,अनिता त्रिलोकानी, भावना छाब्रिया, सुनील या संदर्भात विजया जाधव म्हणाल्या, आचारसंहीता पथकाने संबंधित उमेदवारांना नोटिसा बजावल्या आहेत. या उमेदवारानी आचारसंहिता भंग केल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल. प्रकाशित करावयाच्या साहित्याची परवानगी घेत प्रमाणपत्र घेतल्यानंतरच सोशल मिडीयावर प्रचार करायचा असल्याचे जाधव यांनी सांगितले.