श्रीलंकेचा क्रिकेट संघ पुढील महिन्यात भारतदौ-यावर येत असून तिन्ही क्रिकेट प्रकारांचा समावेश असलेल्या पूर्ण दौ-यात तीन कसोटी सामन्यांसह तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांचा समावेश आहे.
मुंबई / कोलंबो- श्रीलंकेचा क्रिकेट संघ पुढील महिन्यात भारतात येत आहे. तिन्ही क्रिकेट प्रकारांचा समावेश असलेल्या पूर्ण दौ-यात तीन कसोटी सामन्यांसह तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांचा समावेश आहे.
श्रीलंकेच्या दौ-याला कोलकाता कसोटीने सुरुवात होईल. पहिली कसोटी ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर १६ नोव्हेंबरपासून खेळली जाईल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २४ डिसेंबरला होणा-या तिस-या टी-२० लढतीने दौ-याची सांगता होईल.
दुसरी कसोटी नागपूरमध्ये (२४ ते २८ नोव्हेंबर) तसेच तिसरी आणि अंतिम कसोटी नवी दिल्लीत (२ ते ६ डिसेंबर) होईल. तीन वनडे सामन्यांची मालिका धरमशाला (१० डिसेंबर), मोहाली (१३ डिसेंबर) आणि विशाखापट्टमनला (१७ डिसेंबर) रंगेल. तीन टी-२० सामने कटक (२० डिसेंबर), इंदूर (२२ डिसेंबर) आणि मुंबईत (२४ डिसेंबर) होतील.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील ही दुसरी द्विपक्षीय मालिका आहे. जुलै-ऑगस्टमध्ये भारताने श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यात पाहुण्यांनी कसोटी मालिकेत ३-०, वनडे मालिकेत ५-० आणि एकमेव टी-२० (१-०) जिंकत निर्भेळ (९-०) यश मिळवले.
असा असेल दौरा…
कसोटी मालिका
पहिली कसोटी | १६ ते २० नोव्हेंबर | कोलकाता |
दुसरी कसोटी | २४ ते २८ नोव्हेंबर | नागपूर |
तिसरी कसोटी | २ ते ६ डिसेंबर | नवी दिल्ली |
वनडे मालिका
पहिली वनडे | १० डिसेंबर | धरमशाला |
दुसरी वनडे | १३ डिसेंबर | मोहाली |
तिसरी वनडे | १७ डिसेंबर | विशाखापट्टनम |
टी-२० मालिका
पहिली टी-२० | २० डिसेंबर | कटक |
दुसरी टी-२० | २२ डिसेंबर | इंदूर |
तिसरी टी-२० | २४ डिसेंबर | मुंबई |