मूळची शिमल्याची असलेल्या तिने आपण कधी ग्लॅमरस जगतात पाऊल ठेवू असा विचारही केला नव्हता. मात्र नशीब आपल्याला कधी कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही.
शिमला- मूळची शिमल्याची असलेल्या तिने आपण कधी ग्लॅमरस जगतात पाऊल ठेवू असा विचारही केला नव्हता. मात्र नशीब आपल्याला कधी कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे मालविका चौहान-जोहाल या सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या तरुणीने नुकताच मिसेस इंडिया अर्थ-फोटोजेनिकचा मान मिळवला आणि तिचा या क्षेत्रातला प्रवास सुरू झाला.
नवीन आव्हाने स्वीकारण्याची तिची तयारी तिला कुठल्या कुठे घेऊन गेली. मागच्या आठवडय़ात दिल्ली येथे झालेल्या मिसेस इंडिया अर्थ २०१७ मध्ये तिला अनपेक्षितपणे अर्थ- फोटोजेनिकचा किताब मिळाला. महिलांची मुक्ती म्हणजे नेमके काय? असा अंतिम प्रश्न तिला या स्पर्धेत विचारला गेला होता. यावर क्षणाचाही विलंब न लावता तिने अतिशय समाधानकारक उत्तर दिले होते. ‘जेव्हा महिलांच्या डोळ्यात करारीपणा येईल, हृदयात ताकद येईल आणि आत्मविश्वास येईल तेव्हा त्या मुक्त झाल्या असे म्हणता येईल.’ महिला कायमच आशावादी, सगळ्यांची समान काळजी घेणा-या आणि याहूनही महत्त्वाचे त्या शरीरावरचे व्रण आपल्याला मिळालेल्या पदकांप्रमाणे समजणा-या असतात.
मालविका म्हणते, आयुष्यात यापुढे येणा-या आव्हानांसाठी मी उत्सुक आहे. मात्र कुटुंब आणि मित्रमंडळी यांच्याकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळेच मी इथवर पोहोचू शकले. आता कुठं, माझा प्रवास सुरू झाला असून पुढे येणा-या संधींसाठी मी कायमच तयार असेन. यापुढच्या काळात मी माझ्या आवडी जपण्याचा विशेष प्रयत्न करणार असल्याचेही ती म्हणाली.