केरोसिन व धान्य वाटप करण्याअगोदर शिधा लाभार्थीची माहिती जमा करण्याचे काम शिधावाटप धान्य दुकानदारांचे नाही, असे निर्देश देऊन मुंबई उच्च न्यायालयाने शिधावाटप धान्य दुकानदारांना दिलासा दिला आहे.
मुंबई- केरोसिन व धान्य वाटप करण्याअगोदर शिधा लाभार्थीची माहिती जमा करण्याचे काम शिधावाटप धान्य दुकानदारांचे नाही, असे निर्देश देऊन मुंबई उच्च न्यायालयाने शिधावाटप धान्य दुकानदारांना दिलासा दिला आहे.
शिधा वाटप दुकानदारांनी २१ नोव्हेंबर २०१६च्या पाच वाजेपर्यंत शिधा लाभार्थीची माहिती जमा न केल्यास त्यांना देण्यात येणारे धान्य व केरोसिनचा कोटा रद्द करण्यात येईल, अशी नोटिस सांगली-मिरजचे तहसीलदारांनी बजावली होती.
यात शिधावाटप धान्य दुकानदारांना शिधा लाभार्थीचे आधार कार्ड, बँक खाते नंबर, बँकांच्या पासबुकच्या छायाकिंत प्रती आणि फोन नंबर जमा करण्यास सांगण्यात आले होते. याविरोधात ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉप किपर फेडरेशन-पुणे यांनी कोर्टात धाव घेतली होती.
या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली असता, शिधा लाभार्थीची माहिती जमा करण्याचे काम शिधावाटप धान्य दुकानदारांचे नाही, असे निर्देश देऊन मुंबई उच्च न्यायालयाने शिधावाटप धान्य दुकानदारांना दिलासा दिला आहे. तर २८ नोव्हेंबर २०१६च्या दुस-या एका नोटिसीत लाभार्थीनी आधार कार्ड सादर न केल्यास त्यांना अन्नधान्य न देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.