एआयडीएमकेच्या महासचिव व्ही. के. शशिकला या आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
चेन्नई- एआयडीएमकेच्या महासचिव व्ही. के. शशिकला या आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. रविवारी झालेल्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत त्यांची पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली होती.
यानंतर सोमवारी विद्यमान मुख्यमंत्री ओ.पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे सादर केला होता.
आता मंगळवारी शशिकला या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या विश्वासू सहकारी म्हणून त्या ओळखल्या जातात.