जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे सांगितले.
नांदेड- जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे सांगितले.
रामानंदतीर्थ विद्यापीठाने श्री. शरद पवार यांना सन्मानपूर्वक ‘डी.लिट.’प्रदान केली. त्या कार्यक्रमासाठी श्री. पवार नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, बीड या मराठवाडयातल्या जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर पूर्ण?बहुमत होत आहे. याच पद्धतीने महाराष्ट्राच्या सोळा जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येईल, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.