अलिशान पेट्रोल गाडय़ांवरील सेस २ ते ७ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय हैदराबाद येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या २१ व्या बैठकीत घेण्यात आला.
नवी दिल्ली- अलिशान पेट्रोल गाडय़ांवरील सेस २ ते ७ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय हैदराबाद येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या २१ व्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे या गाडय़ांच्या किमती मोठय़ा प्रमाणात वाढणार आहेत. याच बैठकीत खादीग्रामोद्योग केंद्रावर विकल्या जाणा-या ३० वस्तूंवरील जीएसटी कमी केल्याने सामान्य माणसांच्या वापरातील या वस्तूंचे दर कमी होण्याची शक्यता आहे. हैदराबाद येथे जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. यावेळी सामान्य माणसांना लागणा-या ३० वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. दरम्यान महागडय़ांच्या गाडय़ांवर सेस वाढवण्यात आला असला तरी देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने दर न वाढवण्याचे संकेत दिले आहेत. हैदराबादमध्ये जीएसटी परिषदेची २१ वी बैठक पार पडली.
यामध्ये सर्वाचे लक्ष गाडय़ांवरील सेसकडे लागले होते. २० व्या बैठकीत सेस १० टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर कायद्यात फेरबदल करण्यासाठी राष्ट्रपतींनी अध्यादेशही जारी केला होता. पेट्रोल आणि डिझेल कारवर पहिल्याप्रमाणेच सेस आणि जीएसटी मिळून कराचा दर २९ ते ३१ टक्के असेल. मध्यम श्रेणीतील कारवर सेस मिळून जीएसटीचा दर ४३ टक्क्यांऐवजी ४५ टक्के असेल. म्हणजेच सेस २ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. मोठय़ा किमतीच्या कारवर सेस मिळवून जीएसटीचा दर ४३ टक्क्यांऐवजी ४८ टक्के असेल. म्हणजेच सेस ५ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. एसयूव्हीवर सेस मिळवून जीएसटीचा दर ४३ टक्क्यांऐवजी ५० टक्के असेल. म्हणजेच सेस ७ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. हायब्रीड कारवर पहिल्याप्रमाणेच सेस आणि जीएसटी मिळून कराचा दर ४२ टक्केच असेल.
[EPSB]
..तरच बुवा-बाबांचे स्तोम कमी होईल
[/EPSB]