मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये बुधवारी ३४९.३९ अंकांची मोठी घसरण होऊन बाजार २७,५२७ अंकांवर बंद झाला.
मुंबई- मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये बुधवारी ३४९.३९ अंकांची मोठी घसरण होऊन बाजार २७,५२७ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये ११२.२५ अंकांची घसरण होऊन बाजार ८ हजार ५१४ अंकांवर बंद झाला.
शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसाच्या सुरुवातीला २५१.३४ अंकांची घसरण होऊन बाजार २७ हजार ६२५.२७ अंकांवर खुला झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ंसेन्सेक्समध्ये ८२.५ अंकांची घसरण होऊन बाजार ८ हजार ५४४.२० अंकांवर खुला झाला.
कामकाजाच्या सुरुवातीच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयातही नऊ पैशांची घसरण झाली. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एअरटेल, इंडसइंड बँक, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांच्या समभागात सर्वाधिक वाढ दिसून आली. तर ओएनजीसी, टाटा मोटर्स, डीव्हीआर, बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण दिसून आली.