हरियाणातील सिरसा इथल्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली असून यामध्ये अनेक रहस्य उलगडण्याची शक्यता आहे.
हरियाणा- हरियाणातील सिरसा इथल्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली आहे. यामध्ये अनेक रहस्य उलगडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाची झडती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसारच, निमलष्करी दलाची ४१ पथके, लष्कराच्या चार तुकड्या, पोलिसांचा ताफा, डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब स्क्वॉडने शुक्रवारी सकाळी या डे-यात शोधमोहिम सुरू केली. जेसीबी मशीन आणि दहा लोहारही या पथकाच्या सोबत आहेत. त्यामुळे ७०० एकर जागेवरील या आश्रमात सुरू करण्यात आलेली ही मोहिम दिवसभर सुरू राहणार आहे.
राम रहीमच्या या डे-यात अनेकांची हत्या करण्यात आली असून त्यांची हाडं तिथेच जमिनीत पुरण्यात आल्याचा गंभीर आरोप बलात्कार खटल्याच्या सुनावणीवेळी झाला होता. त्यामुळे या डे-यात पुरलेली हाडंही सापडण्याची शक्यता आहे. मात्र प्रसारमाध्यमांना आत प्रवेश दिला गेलेला नाही.
डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांकडून कुठलाही हिंसाचार होऊ नये, याची पूर्ण खबरदारी घेण्यात आल्याची माहिती सिरसाच्या पोलीस अधीक्षकांनी दिली. सतनाम सिंह चौकापासून डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयापर्यंतचा आठ किलोमीटरचा रस्ता बंद करण्यात आला आहे. सतनाम चौकातही सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत.
संबंधित बातम्या
‘गुरमीत राम रहिमला जन्मठेपेची शिक्षा द्या’
Latest visuals from Sirsa: Heavy security deployed, curfew imposed in vicinity of #DeraSachaSauda HQ as search inside the premises continues pic.twitter.com/u1xeSjFVP0
— ANI (@ANI) September 8, 2017
#Haryana: JCB machine entering #DeraSachaSauda HQ in Sirsa; authorities have also called 10 blacksmiths inside the HQ as search ops continue pic.twitter.com/Vb7HrAWRwl
— ANI (@ANI) September 8, 2017