बॉलिवूड अभिनेते ऋषि कपूर यांनी ‘पाकिस्तानी खेळाडूंनाही आयपीएलमध्ये खेळण्याची संधी द्यावी, अशी मागणी ट्विटरच्या माध्यामातून केली आहे.
मुंबई- बॉलिवूड अभिनेते ऋषि कपूर यांनी ‘पाकिस्तानी खेळाडूंनाही आयपीएलमध्ये खेळण्याची संधी द्यावी, अशी मागणी ट्विटरच्या माध्यामातून केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर नाराजीचे सूर उमटत आहेत.
ऋषी कपूर हे ट्विटरवरील अनेक ट्विटमुळे नेहमी चर्चेत असतात. आयपीएलच्या दहाव्या हंगामाला बुधवारीपासून सुरूवात होणार आहे. यावेळी त्यांनी ट्विटरवर ट्विट केले. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘आयपीएममध्ये चांगले खेळाडू आहेत. यावेळी अफगाणिस्तानचे खेळाडूही यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंनाही आयपीएलमध्ये खेळू द्यावे, तर खरा सामना होईल.’
भारत-पाकमधील परंपरागत वादामुळे पाकिस्तानी खेळाडूंना भारतात खेळू देण्यास अनेक राजकीय पक्ष व संघटनांचा विरोध आहे. त्यामुळे आयोजकांनीही पाकिस्तानी खेळाडूंना स्पर्धेपासून दूर ठेवले आहे.
‘पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या सहभागाशिवाय अनेक क्रिकेटप्रेमींना ही स्पर्धा अपुरी वाटत आहे. ऋषी कपूर यांनी ट्विटरद्वारे तीच भावना व्यक्त केली आहे. ऋषी कपूर यांच्या या मताचे काहींनी स्वागत केले तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे.
IPL. You got world players. Afghanistan makes debut. My plea is please consider Pakistani players.Phir match hoga! Hum bade log hain.Please!
— Rishi Kapoor (@chintskap)