४८व्या आंतरजिल्हा आणि ७९व्या महाराष्ट्र राज्य टेबलटेनिस अजिंक्यपद स्पर्धेत रवींद्र कोटियनने पुरुष आणि युथ मुलांच्या एकेरीचे जेतेपद पटकावले. सातव्या मानांकित ममता प्रभूने महिला एकेरीचे जेतेपद मिळवले.
पुणे- ४८व्या आंतरजिल्हा आणि ७९व्या महाराष्ट्र राज्य टेबलटेनिस अजिंक्यपद स्पर्धेत रवींद्र कोटियनने पुरुष आणि युथ मुलांच्या एकेरीचे जेतेपद पटकावले. सातव्या मानांकित ममता प्रभूने महिला एकेरीचे जेतेपद मिळवले. मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणा-या कोटियनने ठाण्याच्या झुबीन तारापोरवालाचा पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत ४-०(११-९, ११-८, १९-१७, ११-४) असा सहज पराभव केला. युथ गटातील (२१ वर्षाखालील मुले) अंतिम सामन्यात रवींद्र शौर्य पेडणेकरचा ११-९, ११-८, ११-५, ११-९ असा धुव्वा उडवत दुहेरी मुकुट मिळवला. महिला एकेरीमध्ये मुंबई उपनगरच्या ममता प्रभूने अव्वल मानांकित सेनहोरा डिसुझावर ४-१(१-९, ११-९, ११-७, ७-११, ११-७) अशी मात केली.
मुलींच्या युथ गटात (मुली) सृष्टी हालेंगडीने श्रेया देशपांडेवर ४-२ (११-६, १४-१२, ११-६, १२-१४, ११-१३, १२-१०) असा विजय मिळवला. ज्युनियर मुले एकेरी गटात रिगन अल्बकर्कने शौर्य पेडणेकरचा ४-१(११९-, ६-११, ११-४, ११-७, ११-३) असा पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली. ज्युनियर मुली गटातील एकेरीच्या अंतिम सामन्यात श्रेया देशपांडेने सृष्टी हालेंगडीवर ४-२ (११-८, ९-११, ११-६, ७-११, १५-१३, ११-७) अशी मात केली. सब-ज्युनियर मुले गटात दीपित पाटील आणि मुलींमध्ये विधी शाह, कॅडेट गटात हविश असरानी (मुले) आणि पृथा वर्तीकर तसेच मिडगेट मुले एकेरीत हृदय जैन आणि जेनिफर वर्गिसने बाजी मारली. पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात सहा दिवस रंगलेल्या ४८व्या आंतरजिल्हा आणि ७९व्या महाराष्ट्र राज्य टेबलटेनिस अजिंक्यपद स्पर्धेत विविध वयोगटात १२०० हून खेळाडूंनी भाग घेतला. इलेव्हन स्पोर्ट्सच्या विटा दानी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस
वितरण कार्यक्रम झाला.
विजेते : पुरुष एकेरी : रवींद्र कोटियन, महिला एकेरी : ममता प्रभू.
युथ मुले एकेरी : रवींद्र कोटियन,
युथ मुली एकेरी : सृष्टी हालेंगडी. ज्युनियर मुले एकेरी : रिगन अल्बकर्क, ज्युनियर मुली एकेरी : श्रेया देशपांडे, सब-ज्युनियर मुली एकेरी : विधी शाह, सब-ज्युनियर मुले एकेरी : दीपित पाटील. कॅडेट मुले एकेरी : हविश असराणी, कॅडेट मुली एकेरी : पृथा वर्तीकर. मिडेट मुले एकेरी : हृदय जैन, मिडेट मुली एकेरी : जेनिफर वर्गिस.
[EPSB]
कोकणी जनतेचा ‘स्वाभिमान’ जागला!
[/EPSB]