भारतीय नियमक मंडळाने भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना प्रशिक्षक म्हणून वर्षाला सात कोटींहून अधिक रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे.
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना प्रशिक्षक म्हणून वर्षाला सात कोटींहून अधिक रुपयांचे पॅकेज दिले जाणार असल्याचे समजते. बीसीसीआयने शास्त्रींना तशी ऑफर दिली आहे.
ही रक्कम साडेसात कोटींपेक्षा जास्त नसेल, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. शास्त्रींसोबत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रसिक्षकांचे वार्षिक मानधन दोन कोटींपर्यंतच असल्याचे सांगितले जाते.
अनिल कुंबळे याने प्रशिक्षकपदासाठी साधारण इतक्याच रकमेची मागणी केली होती. बीसीसीआयने काही प्रमाणात त्या मागणीची दखल घेत शास्त्रींना सात कोटींचे पॅकेज देण्याचे ठरवले असावे, अशी माहिकी मिळते. या संदर्भातील करारांना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया सुरू आहे.