देवरूख तालुक्यात तापसरीने तीन बळी घेतल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
रत्नागिरी- देवरूख तालुक्यात तापसरीने तीन बळी घेतल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली
आहे. जानेवारी २०१७ पासून जिल्ह्यात तापसरीचे २६ हजार ७६९ रुग्ण सापडले आहेत. रक्तनमुन्यांच्या तपासणीअंती ५७ जणांना हिवताप, २३ जणांना डेंग्यू आणि ६ जणांना लेप्टोची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. देवरूख तालुक्यात तापसरीच्या आजाराने डोके वर काढले आहे. तापसरीच्या आजाराने देवरुखातील विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. हा तापसरीचा तिसरा बळी ठरला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
जानेवारी २०१७ पासून जिल्ह्यात २६ हजार ७६९ तापसरीचे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मंडणगड तालुक्यात १ हजार २३९, दापोलीत २ हजार ६३४, खेड ५ हजार ६५५, गुहागर १ हजार ६३६, चिपळूण ४ हजार २८६, संगमेश्वर २ हजार ८९४, रत्नागिरी ३ हजार ९५७, लांजा १ हजार ४९४ आणि राजापूर तालुक्यात २ हजार ९७४ रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या सर्व रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. २६ हजार ७६९ रुग्णांच्या हिवतापासाठी, ५८ जणांच्या डेंग्यू आणि ४९ जणांच्या लेप्टोसाठी तपासण्या करण्यात आल्या. यापैकी ५७ जणांना हिवताप, २३ जणांना डेंग्यू आणि ६ जणांना लेप्टोची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
मंडणगड तालुक्यातून घेतलेले १ हजार २३९ रक्तनमुन्यांपैकी एकाचाही अहवाल बाधित आलेला नाही. दापोलीत हिवतापाचा एक, खेडमध्ये हिवतापाचे चार आणि डेंग्यूचे ८ रुग्ण सापडले. गुहागरमध्ये हिवतापाचे ४, चिपळूण हिवतापाचे ४ आणि डेंग्यूचे ३, संगमेश्वर हिवतापाचे १०, डेंग्यूचे २ आणि लेप्टोचे ३ रुग्ण सापडले आहेत. रत्नागिरीत हिवतापाचे २७, डेंग्यूचे ७ आणि लेप्टोचे ३ रुग्ण, लांजात हिवतापाचे २ आणि डेंग्यूचे ३ रुग्ण सापडले तर राजापूरमध्ये हिवतापाचे पाच रुग्ण नऊ महिन्यात सापडले आहेत.
संगमेश्वरमध्ये १३ वैद्यकीय पथके
मोठय़ा प्रमाणावर तापाची साथ असलेल्या संगमेश्वरमध्ये १३ वैद्यकीय पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांमार्फत रक्ततपासणी आणि घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. या भागातील ६४५ घरांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये १ हजार १८९ कंटेनर तपासण्यात आले. यापैकी १३ कंटेनर दूषित असल्याचे आढळून आले आहेत. ७ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. तालुका आरोग्य यंत्रणेने शुक्रवारी दिवसभर तब्बल ९६० घरांमध्ये जाऊन ४ हजार १४३ जणांचा सव्र्हे या पथकांच्या माध्यमातून पूर्ण केला. यात ४३ संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी ३० जणांचे रक्त नमुने घेण्यात आले. संगमेश्वरमध्ये मृत तीनजणांना अन्य आजारही होते असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. तसेच या कालावधीत ‘व्हायरल फिव्हर’ बाबत काळजी घ्या, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. व्हायरल फिव्हर टाळण्यासाठी दूषित पदार्थाचे सेवन टाळा, स्वच्छता राखा, भरपूर पाणी प्या, थंड पाण्याने शरीर पुसून काढा, स्वच्छ कपडय़ाच्या घडय़ा कपाळावर ठेवा, अतिथंड पदार्थाचे सेवन टाळा, पौष्टिक आहार घ्या आणि आजार झालेल्या व्यक्तींसोबत सहवास टाळा अशा सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत.
[EPSB]
डॉ. दीपक अमरापूरकर मृत्यूप्रकरणी चारजणांना अटक
बॉम्बे रुग्णालयाचे पोटविकारतज्ज्ञ डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी दादर पोलिसांनी परळमध्ये राहणा-या चारजणांना अटक केली आहे.
[/EPSB]