मध्यमवर्गीय माणूस नेहमी एक गोष्ट म्हणतो, शहाण्याने कोर्टाची पायरी कधी चढू नये, खरंच आहे म्हणा. जिथे जाऊ तिथले कायदे, न्यायाची पद्धत वेगळी आहे.
मध्यमवर्गीय माणूस नेहमी एक गोष्ट म्हणतो, शहाण्याने कोर्टाची पायरी कधी चढू नये, खरंच आहे म्हणा. जिथे जाऊ तिथले कायदे, न्यायाची पद्धत वेगळी आहे. अशा काही कायद्यांचे आणि खटल्यांचे मनोरंजन म्हणून नलिनी जोशी यांनी ‘राणीच्या राज्यातले कायदे’ ह्या पुस्तकात मांडल्या आहेत. आजही खेडय़ांमध्ये पंचायत बसवून न्यायनिवाडा केला जातो. तर काही ठिकाणी आज २१ व्या शतकात पदार्पण करत असताना सुद्धा राजघराणी असल्याने त्यातील महत्त्वाची व्यक्ती देशाचा कारभार आणि न्यायनिवाडा करताना दिसते. ही न्यायदानाची समांतर दोन टोके आहेत, असे म्हणता येईल. प्रत्येक ठिकाणची न्यायाची पद्धत वेगळी असल्याने काही खटले गंमतीदार असतात तर काही गंभीर, थरकाप उडवणारे सुद्धा तर काही केवळ मनोरंजन करणारे असतात. कोर्टात एखादी नवी केस आली की ज्या व्यक्तींना कायद्यात, खटल्यांमध्ये रस असतो.
अशांची गर्दी खटल्याच्या पहिल्या दोन तारखेत दिसते. मात्र ठरावीक काळानंतर कोर्टाच्या बाहेरील टपरीवरच्या चहाबरोबर ती केस चघळण्यात आणखी मजा असते. अशाच काही राणीच्या राज्यातले कायदे आणि त्या कायद्यांवर असलेले नवनवीन खटले नलिनी जोशी यांनी त्यांच्या ‘अक्षर प्रकाशन’ ‘राणीच्या राज्यातले कायदे’ ह्या पुस्तकात मांडल्या आहेत. राणीच्या राज्यातले कायदे म्हणजे, इंग्लंडमधल्या न्यायालयीन खटल्यांचा ओझरता आढावा लेखिकेने येथे घेतला आहे. प्रत्येक कोर्टातील खटले हे ब-यापैकी रंजक असतात. अशाच इंग्लंडच्या कोर्टातील खटल्यांची दखल लेखिकेने निखळ मनोरंजन म्हणून घेतली. सत्य घटनेवर आधारित ह्या लेखांमध्ये मात्र व्यक्तींची ओळख, स्थळ काल्पनिक देण्यात आले आहे. केवळ मनोरंजन हा एकच या पुस्तकामागील उद्देश. मनोरंजन तर होणारच कारण अनुभवी न्यायाधीशसुद्धा क्षणभरासाठी चक्रावून जाईल अशा खटल्यांचा पुस्तकात उल्लेख आहे.
पुस्तकाचे नाव : राणीच्या राज्यातले कायदे
लेखिका : नलिनी जोशी
प्रकाशन : अक्षर प्रकाशन
पृष्ठ : ९५
मूल्य : १०० रुपये
[EPSB]
लर्न टू रीड द मॅड वे ऑफ लाईफ अशी टॅगलाईन समोर ठेवून लिहिलेल्या लेखक, प्रख्यात कलाकार अबू मलिक यांच्या रँटिंग्ज ऑफ अ मॅड मॅन या इंग्रजी पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले.
[/EPSB]