अमेरिकेतील भाषणादरम्यान घराणेशाहीचे समर्थन करणा-या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी टीकास्त्र सोडले.
नवी दिल्ली- अमेरिकेतील भाषणादरम्यान घराणेशाहीचे समर्थन करणा-या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी टीकास्त्र सोडले. ‘जेव्हा त्यांनी अमेरिकेत बसून घराणेशाही भारताचा स्वभाव असल्याचे म्हटले, तेव्हा मला लाज वाटली’, असे जेटली यांनी सांगितले. राहुल गांधी आठवडय़ाभरापूर्वी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसमधील घराणेशाहीविषयी विचारणा करण्यात आली असता त्यांनी हा आमच्या एकटय़ाचाच दोष नसल्याचे सांगितले. भारतामध्ये राजकीय, चित्रपट आणि उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात घराणेशाही असल्याचे म्हटले होते. भारतामध्ये कारभार अशाच पद्धतीने चालतो, असे सांगत त्यांनी घराणेशाहीचे समर्थन केले होते. राहुल यांच्या या वक्तव्यावर अरुण जेटलींनी आज प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, परदेशात जाऊन स्वत:च्या देशाबाबत अशी वक्तव्ये करणे हे लज्जास्पद आहे. काही राजकीय पक्षांना घराणेशाही आपल्या आपल्या हिताची वाटते. मात्र, बराच काळ हा प्रकार सुरू राहिल्यास त्याचेही ओझे निर्माण होते, असे जेटली यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीदेखील टीका केली होती. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या राजकीय कारकिर्दीचा दाखला दिला होता.
[EPSB]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परदेश दौ-यानंतरच मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
[/EPSB]