जगातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशा अंतर्वस्त्रांच्या अग्रेसर ब्रॅण्डने आपला वारसा ग्राहकांसमोर जिवंत करण्यासाठी मुंबई आणि बेंगळुरू येथे अनोख्या पॉप-अप संग्रहालयाची सुरुवात केली आहे.
जॉकी ब्रॅण्डचा इतिहास आणि या इतिहासातील काही महत्त्वाचे टप्पे या पॉप-अप संग्रहालयाच्या माध्यमातून सादर करण्यात आले असून १९३४ साली ब्रीफ प्रकाराचा लावलेला शोध, १९३५ मध्ये क्रांतिकारी अशा वाय-फ्रंट डिझाईनची रचना, १९३८ साली ‘सेलोफेन वेिडग’ हा जगातला अंतर्वस्त्रांचा पहिलावहिला फॅशन शो, १९५८ साली प्रसारित झालेली अंतर्वस्त्रांची पहिली टीव्ही जाहिरात, १९६२ साली नासाच्या अपोलो मिशनसाठी तयार केलेली वैशिष्टय़पूर्ण अंडरवेअर उत्पादने, १९७२ साली अंतर्वस्त्रांच्या पॅकेजिंगमध्ये प्रथमच बॉक्स पॅकेजिंग पद्धतीचा केलेला वापर, १९९५ साली भारतात प्रथमच आयोजित केलेला अंतर्वस्त्रांचा फॅशन शो यांसारख्या ब-याचशा महत्त्वाच्या घटनांचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला आहे.
१८७६ साली स्थापन झालेल्या जॉकी या ब्रॅण्डचा वस्त्रोद्योगातील एक महत्त्वाचे अंग असलेल्या प्रकारात सर्वप्रथम पाऊल टाकण्यात आणि त्यात कल्पक संशोधन करण्यात मोलाचा वाटा आहे. मग ते १९३४ साली पुरुषांसाठीची बिकिनी प्रथमच तयार करणे असो वा १९६२ साली नासाच्या अपोलो मिशनमध्ये सहभागी झालेल्या अंतराळवीरांसाठी खास प्रकारच्या अंडरवेअर तयार करणे असो.. अंतर्वस्त्रांच्या विविध कॅटेगरींचे अतुलनीय विपणन व जाहीरात करून जॉकी या ब्रॅण्डने या उद्योगक्षेत्राला ख-या अर्थाने आकार दिला आहे. जॉकीच्या अंतर्वस्त्रांवर ब्रॅण्डचे नाव प्रथम कोरले (शिवले) गेले, त्यालाही यंदा ७० वष्रे पूर्ण झाली आहेत. जॉकीने वेस्टबॅण्डवर ब्रॅिडग करणे हे त्या काळात फारच धाडसाचे होते आणि जॉकीने त्या काळात ठरलेली चौकट मोडून पाडलेला हा पायंडा आजही अनेक अन्य ब्रॅण्डमध्ये दिसून येतो.
[EPSB]
[/EPSB]