सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली येथून नवी मुंबईकरांसाठी पाणीपुरवठा करणा-या मोरबे धरणाची पाण्याची पाईपलाईन शनिवारी सकाळी जेसीबीच्या धक्क्याने फुटल्याने २ तासांपेक्षा जास्त काळ लाखो लिटर पाणी वाया गेले.
पनवेल- सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली येथून नवी मुंबईकरांसाठी पाणीपुरवठा करणा-या मोरबे धरणाची पाण्याची पाईपलाईन शनिवारी सकाळी जेसीबीच्या धक्क्याने फुटल्याने २ तासांपेक्षा जास्त काळ लाखो लिटर पाणी वाया गेले. परंतु, नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने वाया जाणारे पाणी थांबविण्यात यश मिळविले.
मोरबे धरणातून नवी मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जातो. ही पाईपलाईन कळंबोली येथून जाते. याच ठिकाणी सिडकोमार्फत कामोठा ते कळंबोली भुयारी मार्गापर्यंत सव्र्हीस रोडचे काम करत आहे. त्यामुळे सदर काम हे जेसीबी मशिनद्वारे करण्यात येत आहे. तेथे काम करणा-या एका जेसीबीचा धक्का या पाईपलाईनला शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास लागला व मोठय़ा प्रमाणात पाण्याचे फवारे उंचच उंच उडू लागले.
साधारण ४० ते ५० फुट हे पाण्याचे फवारे उडत होते. त्यामुळे येथून जाणा-या गाडय़ांना चांगलीच आंघोळ होत होती. या पाण्याच्या फवा-याची माहिती मिळताच कळंबोली परिसरातील अनेकजण हे कारंजे पाहण्यासाठी झाले होते. कळंबोली पोलीस, अग्निशमन दल त्वरित घटनास्थळी पोहोचले व त्यांनी संदर्भातील माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिली.
तातडीने संबंधित अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले व त्यांनी वाहून जाणारे पाणी धरणाच्या मुख्य दरवाजातून बंद केले व दुरुस्ती काम युद्धपातळीवर सुरू केले. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया गेल्याने नवी मुंबई परिसरात होणारा पाणीपुरवठा हा कमी दाबाने होणार असल्याची माहिती संबंधित अधिका-यांनी दिली
[EPSB]
काटेरी कुंपणातील विव्हळणारे ‘अंगण’
[/EPSB]