देशातील पेट्रोल पंप चालकांनी १३ ऑक्टोबर रोजी पुकारलेला संप मागे घेत असल्यची घोषणा केली आहे.
मुंबई- देशातील पेट्रोल पंप चालकांनी १३ ऑक्टोबर रोजी पुकारलेला संप मागे घेत असल्यची घोषणा केली आहे. पेट्रोल पंप व्यवसायावरील जाचक अटी, ऑईल कंपन्यांची आणि शासनाची मनमानी, तसेच प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष याविरोधात देशातील पेट्रोल पंपचालकांनी हा संप पुकारला होता. मात्र तुर्तास हा संप मागे घेण्यात येत असल्याचे पेट्रोल चालकांच्या संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
ऑईल कंपनी बरोबर ४ नोव्हेंबर २०१६ झालेला पण न पाळलेला करार, मार्केटिंग डिसीप्लीन गाईडलाईनमध्ये लावलेल्या प्रमाणाबाहेरील अन्यायकारक पेनल्टीज, कबुल केलेले पण न दिलेले डीलर मार्जिन, रोज बदलणाऱ्या दरामुळे ग्राहक आणि डीलर्सचे होत असलेले नुकसान, राज्यानुसार बदलणारे दर यामुळे येणाऱ्या अडचणींच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला होता. मात्र तुर्तास तो मागे घेण्यात आला आहे.