योगगुरू आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी आपला उत्तराधिकारी कोण असणार याविषयावर पडदा टाकला आहे.
नवी दिल्ली- योगगुरू आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी आपला उत्तराधिकारी कोण असणार याविषयावर पडदा टाकला आहे. बाबा रामदेव यांच्या उत्तराधिकारीपदी पाचशे साधुंचे पथक असणार आहे. दहा हजार कोटींची उलाढाल पतंजलीची आहे. एका खासगी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाबा रामदेव म्हणाले की, माझा उत्तराधिकारी कोणी व्यापारी किंवा सांसारिक व्यक्ती नसेल. मी पाचशे साधुंचे एक पथक तयार करीत आहे. त्यांना प्रशिक्षित केले आहे. मी कधीही छोटा विचार करीत नाही, मोठा विचार करतो. देशाच्या प्रगतीविषयी विचार करतो. पतंजली समूह येणा-या शंभर वर्षात कुठे असेल याचा विचार करतो.
पतंजली ही एक हिंदू कंपनी असल्याची करण्यात येणा-या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, असा प्रश्न हमीद बंधूंच्या कंपनीविषयी का केला जात नाही. हिमालय समूहाचे फारूक भाई यांनी मला योगग्रामसाठी जमीन दान दिली आहे. उपचारासाठी गोमूत्राचा उपयोग केला जातो, असे कुराणमध्ये लिहिले आहे. मुस्लिम समाजानेही गोमूत्राचा उपयोग केलेल्या औषधांचा वापर केला पाहिजे.
[EPSB]
[/EPSB]