बाबा राम रहीमला अटक झाल्यानंतर हिंसाचार माजविण्यासाठी त्याची मानलेली मुलगी हनीप्रीतने १.२५ कोटी रुपये खर्च केल्याचे तपासात उघड होत आहे.
पंचकुला- बाबा राम रहीमला अटक झाल्यानंतर हिंसाचार माजविण्यासाठी त्याची मानलेली मुलगी हनीप्रीतने १.२५ कोटी रुपये खर्च केल्याचे तपासात उघड होत आहे.
‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख बाबा राम रहीमची दत्तक कन्या हनीप्रीत हिने पंचकुला येथे हिंसाचार घडवून आणण्यासाठी तब्बल सव्वा कोटी रुपये वाटल्याची माहिती समोर आली आहे. २५ ऑगस्टला विशेष न्यायालयाने बलात्कार प्रकरणात बाबा राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर पंचकुला परिसरातील त्याच्या समर्थकांचा जमाव आक्रमक झाला होता.
या जमावाने मोठय़ा प्रमाणावर नासधूस आणि जाळपोळ केला होता. यावेळी झालेल्या हिंसाचारात ३५ जणांचा बळी गेला होता. हे सर्व हनीप्रीतने घडवून आणल्याचा दावा हरियाणा पोलिसांनी केला आहे. त्यासाठी तिने ‘डेरा सच्चा सौदा’च्या चमकोर सिंग व दान सिंग या दोन अनुयायांच्या माध्यमातून १.२५ कोटी रुपये हल्लेखोरांना दिले होते. सध्या हनीप्रीत पोलीस कोठडीत आहे. पोलिसांना चकवा देणा-या हनीप्रीतला मंगळवारी दुपारी पंजाबमधील झिरकापूर – पतियाळा रस्त्यावरून अटक करण्यात आली होती. बुधवारी हनीप्रीतला हरियाणातील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर तिची रवानगी कोठडीत करण्यात आली. मात्र, हनीप्रीत चौकशीत सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
[EPSB]
जीएसटी लागू करण्यात घाई : राहुल गांधी
जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने जी घाई केली, त्याचमुळे देशात बेरोजगारीचे संकट निर्माण झाले, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
[/EPSB]