जम्मू-काश्मीरमधील पंपोर येथे सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये ५६ तास चाललेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील पंपोर येथे सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये ५६ तास चाललेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील सरकारी इमारतीत हे दहशतवादी लपले होते.
मेजर जनरल अशोक नरूला म्हणाले की, या इमारतीतून दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ही चकमक संपली आहे. फेब्रुवारीत याच इमारतीत झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे पाच जवान ठार झाले होते.
पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन लष्कराने यावेळी कारवाई करताना अत्यंत सावध भूमिका घेतली होती. या इमारतीत ६० खोल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक खोली तपासून लष्कराने ही कारवाई केली. त्यासाठी पुरेसा वेळ घेतला. मोठे नुकसान टाळून दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश मिळाले.