तांत्रिक बिघाड पाचवीला पूजलेल्या मध्य रेल्वेची वाहतूक शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा एकदा विस्कळीत झाली. कल्याण आणि ठाकुर्ली या स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हा प्रकार घडला.
मुंबई- तांत्रिक बिघाड पाचवीला पूजलेल्या मध्य रेल्वेची वाहतूक शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा एकदा विस्कळीत झाली. कल्याण आणि ठाकुर्ली या स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हा प्रकार घडला. त्यामुळे सध्या कर्जत आणि कल्याण मार्गावरील मध्य रेल्वेची वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. तर उर्वरित मार्गावरील गाडय़ांचे वेळापत्रकही कोलमडले आहे.
ऐन संध्याकाळी गर्दीच्या वेळेत हा बिघाड झाल्याने कामावरून घरी जाण्यासाठी निघालेल्या लोकांना मोठय़ा गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून हा बिघाड दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, त्यासाठी नेमका किती कालावधी लागेल, हे प्रशासनाने सांगितलेले नाही. मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा होण्याची ही काही पहिली वेळ नाही. लोकल प्रवास करणा-या सगळ्याच प्रवाशांना दररोज काही ना काही कारणांमुळे लोकलचा उशीर सहन करावा लागतो.
[EPSB]
[/EPSB]