लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत असून, बुधवारी २७०० रु प्रति क्विंटल तर सरासरी २४५० रुपये आणि कमीत कमी १००० रु भाव मिळाला.
निफाड- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत असून, बुधवारी २७०० रु प्रति क्विंटल तर सरासरी २४५० रुपये आणि कमीत कमी १००० रु भाव मिळाला. यामुळे परतीच्या पावसाने झोडपलेल्या शेतक-यांना तूर्तास कांद्याकडून दिलासा मिळत आहे. मध्यंतरीच्या काळात कांदा भावात मोठय़ा प्रमाणावर घसरण झाली होती. परिणामी शेतकरी वर्गात नाराजी होती. परंतु गत आठवडय़ापासून कांद्याला चांगले भाव मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण दिसत आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी सुमारे १८००० क्विंटक कांद्याची आवक झाली. संततधार पावसामुळे बाजार समिती आवारात कांद्याची आवक ही कमी झालेली दिसली. परतीच्या पावसामुळे शेतातील उभ्या कांद्याचे होणारे नुकसान, रब्बी कांद्याचे रोपांचे होणारे नुकसान तसेच साठवणुकीतील कांद्याची गुणवत्ता ढासळत आहे. त्याचबरोबर नवीन कांदा बाजारात येण्यास अजून वेळ आहे. त्यात कांद्याला सर्वत्र मागणी वाढत असल्याने कांद्याचे दर चढेच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्वसामान्यांना कांदा पुन्हा रडवणार आवक कमी झाल्याने कांद्याचे दर हे वाढलेले दिसत आहेत. कांद्याच्या दराने या आठवडय़ापासून उभारी घ्यायला सुरुवात केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून किरकोळ बाजारात सात ते दहा रुपये किलोवर स्थिरावलेला कांदा आता पंचवीस ते तीस रुपये किलोपयर्ंत पोहोचल्याने यापुढे कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापा-यांनीही वर्तवली आहे.