राज्यातील सुरू असलेल्या खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय) व एमसीव्हीसीच्या कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला नसल्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांनी तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2015/07/IDEAL-COLLEGE.jpg)
मुंबई- राज्यातील सुरू असलेल्या खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय) व एमसीव्हीसीच्या कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला नसल्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांनी तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.
राष्ट्रवादीचे विक्रम काळे, हेमंत टकले, अमरसिंह पंडित यांनी राज्यातील खासगी आयटीआय संस्था व एमसीव्हीसीच्या कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
यावर निलंगेकर यांनी राज्यात २००१ पूर्वी मान्यता दिलेल्या खासगी आयटीआय संस्थांना व एमसीव्हीसीच्या कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्यासाठी सरकारने अंतिम निर्णय घेतला नसल्याचे आपल्या लेखी उत्तरात सांगितले.