एन के जी एस बी बँकेने नुकतेच शतक महोत्सवी वर्ष साजरे केले असून बँकेने उद्योगपती व शीख समाज इंदूरचे सेक्रेटरी जसबीर सिंग गांधी यांच्या हस्ते १०६ व्या शाखेचे उदघाटन केले.
मुंबई- एन के जी एस बी बँकेने नुकतेच शतक महोत्सवी वर्ष साजरे केले असून बँकेने उद्योगपती व शीख समाज इंदूरचे सेक्रेटरी जसबीर सिंग गांधी यांच्या हस्ते १०६ व्या शाखेचे उदघाटन केले. जनहिताच्या योजनाला राबविताना आíथक प्रगतीच्या मार्गावर बँकेने जोरदार वाटचाल सुरु केली असून त्यामुळेच बँकेला बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशन यांच्यातर्फे ३ हजार कोटी रुपये ठेवी असलेल्या बँकांमध्ये दोन पुरस्कार मिळाले तर महाराष्ट्र अर्बन को. ऑप. बँक फेडरेशनतर्फे सुध्दा पुरस्कार मिळाला.
असे उद्गार बँकेचे अध्यक्ष किशोर कुलकर्णी यांनी इंदूर येथे उद्घाटन प्रसंगी काढले. कुलकर्णी पुढे म्हणाले की, हे पुरस्कार मोठ मोठया बँकांच्या स्पध्रेमध्ये मिळाले हे उल्लेखनीय असून दोन्ही संस्थांनी एकाच वेळी एन के जी एस बी बँकेला शतक महोत्सवी वर्षात गौरविले ही गोष्ट अभिमानास्पद आहे.
व्यवस्थापकीय संचालक चिंतामणी नाडकर्णी म्हणाले बँकेमध्ये वरिष्ठ नागरीकांच्या ठेवींचा हिस्सा ३८ टक्के असून बँक ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक यांच्याशी संवाद साधून चांगली सेवा देण्यासाठी जिथे जिथे शाखा आहेत तिथे संपर्क मोहिम राबविणार. संचालक मंडळाचे अचूक धोरण, कर्मचा-यांची मेहनत आणि सभासदांचा बँकेवरील विश्वास यामुळे हे पुरस्कार मिळाले असून येणा-या आíथक वर्षामध्ये कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी बँक केरळ, उत्तर प्रदेशात शाखा उघडण्याचा मानस आहे. इंदूर शाखेच्या उद्घाटन प्रसंगी संचालक नागेश फोवकर, राजन भट, लक्ष्मीकांत प्रभू, अनिल नाडकर्णी, अरूण कसबेकर, उप व्यवस्थापकीय संचालक पी जी कामत, विनय राव, अरुण अलंगढी, मयुरेश मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.
[EPSB]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हत्या करण्यासाठी ६५ लाखांची सुपारी देण्यात येत आहे. हा धक्कादायक खुलासा एका १९ वर्षीय विद्याथ्यार्ने केला आहे.
[/EPSB]