भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा हे संचालक असलेल्या कंपनीचा डोळे दीपवणारा ‘विकास’ यासाठी निमित्त ठरलाय. काँग्रेसने रविवारी पत्रकार परिषद घेऊन या कंपनीची चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली.
नवी दिल्ली- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा हे संचालक असलेल्या कंपनीचा डोळे दीपवणारा ‘विकास’ यासाठी निमित्त ठरलाय. काँग्रेसने रविवारी पत्रकार परिषद घेऊन या कंपनीची चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केलेल्या आरोपांनुसार जय शहा संचालक असलेल्या टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने यंदाच्या वर्षी ८०.५ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल केली आहे. टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडने स्वत:हूनच ही माहिती कंपनी नोंदणी कार्यालयाला दिली आहे.
मात्र, कंपनीच्या गेल्यावर्षीच्या उलाढालीवर नजर टाकल्यास यामध्ये तब्बल १६,००० पटीने वाढ झाली आहे. परंतु, या कंपनीकडे कोणत्याही मालाचा साठा किंवा संपत्ती नसूनही त्यांनी इतका उत्कर्ष कसा साधला, असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. हे आश्चर्यकारक नाही का? महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्ताबदल झाल्यानंतर हे सर्व घडले आहे. यालाच भांडवलदारांची कंपूशाही म्हणतात. आता पंतप्रधान सीबीआयला या सगळ्याची चौकशी करायला सांगणार आहेत का? जय शहा यांना अटक होईल का? पंतप्रधान शहा यांच्या मुलाची चौकशी करण्याचा प्रामाणिकपणा दाखवणार का?, असेही सिब्बल यांनी विचारले.
तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जय शहा हे नोटाबंदीच्या निर्णयाचे सर्वात मोठे लाभार्थी असल्याचा आरोप केला आहे. अखेर नोटाबंदीमुळे फायदा झालेले लोक आपल्यासमोर आले आहेत.अमित शहा हेच नोटाबंदीचे ‘शहा-इन-शहा’ आहेत, अशी शाब्दिक कोटी राहुल यांनी ट्विटरवरून केली आहे.
दरम्यान, या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचा खुलासा शहा यांनी केला आहे. तसेच संबंधित वृत्त देणा-या न्यूज पोर्टलवर शंभर कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले असे, शहा यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.
[EPSB]
अमेरिका दौ-यावर जाण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ‘काँग्रेसने क्षमतेच्या आधारे नेते निवडावेत,’ अशा शब्दांमध्ये जेटलींनी राहुल गांधींवर शरसंधान साधले.
[/EPSB]