तळेगाव येथील बालिकेवरील अतिप्रसंगाचे पडसाद नाशिकपाठोपाठ सोमवारी धुळ्यातही उमटले.
नाशिक/धुळे- तळेगाव येथील बालिकेवरील अतिप्रसंगाचे पडसाद नाशिकपाठोपाठ सोमवारी धुळ्यातही उमटले. मराठा क्रांती मोर्चाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांचा पुतळा जाळून त्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली.
नाशिकमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा काही काळ खंडीत करण्यात आली होती. शहरातील बससेवाही बंद होती.
गिरीष महाजन यांचा पुतळा धुळ्यात जाळला!
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या बेजबाबदार व चिथावणीखोर विधानाने सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. संशयित आरोपीला यामुळे मदतीचे बळ मिळत आहे. आरोपीला मदत करणारा हा आरोपीच असतो, म्हणून गिरीष महाजन यांच्या बेजबाबदार विधानामुळे बिघडलेली परिस्थिती पाहता त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी ककरणयत आली. तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना देण्यात आले.