विधानसभा निवडणुकीत प्रचाराची राळ उडवताना केलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी विसरून माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे पिता मुलायमसिंह यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीला उपस्थिती लावली.
लखनऊ- विधानसभा निवडणुकीत प्रचाराची राळ उडवताना केलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी विसरून माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे पिता मुलायमसिंह यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीला उपस्थिती लावली. येथील काशीराम स्मृती उपवनात सुमारे ९० मिनिटे झालेल्या कार्यक्रमानंतर हे पिता पुत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेले. काही काळ दोघांच्यात संवाद झाला.
पंतप्रधान मोदी यांनी अखिलेशशी हस्तांदोलन केले. त्याच्या खांद्यावर हात ठेवत सन्मानपूर्वक वागणूक दिली. त्यांनी मुलायमसिंग यांचा हात हातात घेऊन त्यांच्याशी ‘हितगुज’ केले. मुलायम यांनी काही त्यांच्या कानाशी जाऊन बोलले ते त्यांनी ऐकून घेतले.
निवडणूक प्रचारात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा उल्लेख स्कॅम (समाजवादी काँग्रेस आणि मायावती) असा मोदी यांनी केला होता. त्यावर पलटवार करताना अखिलेश यांनी या स्कॅमची फोड सेव्ह कम्युनिटी फ्रॉम अमित अँड मोदी अशी केली होती.