ऐन पावसात झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला असून प्रवाशांच्या मदतीसाठी मध्य रेल्वेने हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत.
मुंबई- नागपूरहून मुंबईला येणा-या दुरांतो एक्सप्रेसचे नऊ डबे रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली. त्यामुळेप्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ऐन पावसात झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला असून प्रवाशांच्या मदतीसाठी मध्य रेल्वेने हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. मदतीसाठी या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केलेे आहे.
मंगळवारी सकाळच्या सुमारास ‘दुरांतो एक्स्प्रेस’चे नऊ डबे रुळावरून घसरले. लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक दाबल्याने मोठा अपघात टळल्याचे समजते. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. मात्र काही प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र या अपघाताचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे.
प्रवाशांसाठी हेल्पलाइन नंबरः
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- २२६९ ४०४०
ठाणे – २५३३ ४८४०
कल्याण- २३११ ४९९
दादर – २४११ ४८३६
नागपूर – २५६४ ३४२
भुसावळ- ०२५८२- २२२२८६
नाशिक रोड – ०२५३-२४६७८६३
मनमाड – ०२५९१- २२२३४५