मुंबईतील नाल्यांमधील सफाई करण्यासाठी यंदा सुमारे दीडशे ते पावणेदोनशे कोटी रुपये खर्च केले जातात.
मुंबई- मुंबईतील नाल्यांमधील सफाई करण्यासाठी यंदा सुमारे दीडशे ते पावणेदोनशे कोटी रुपये खर्च केले जातात. तरीही अनेक झोपडपट्टी भागांमधून जाणा-या नाल्यांची सफाई केल्यानंतरही पुन्हा एकदा त्यात कचरा टाकलेला दिसत आहे.
एकप्रकारे नाल्याला स्थानिकांनी कचरा भराव भूमी (डम्पिंग ग्राऊंड) बनवलेले आहे. त्यामुळे पावसापूर्वी असलेली नाल्यांची स्थिती साफसफाईनंतर पुन्हा पावसात दिसू आली आहे. त्यामुळे मुंबईतील ११७ नाल्यांचा वापर हा कचरा टाकण्यासाठीच वापरला जात आहे. या सर्व नाल्यांची यादीच प्रशासनाने जाहीर करून याठिकाणी विशेष लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला.
मुंबई शहरातील कुलाबा ते परळपर्यंतचा भाग वगळला तर वरळी आणि वडाळापासून दहिसर व मुलुंड पर्यंतच्या १८ प्रभाग कार्यालयांमधील ११७ नाल्यांमध्ये पुन्हा पुन्हा कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या सर्व नाल्यांच्या ठिकाणी माहिती फलक लावून सफाईपूर्वी, सफाईदरम्यान आणि सफाईनंतर अशाप्रकारे नाल्यांची छायाचित्रे प्रदर्शित करून नागरिकांना नाल्यांमध्ये कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे.
झोपडयांमधून कचरा फेकला जाणारे नाले
एफ/उत्तर- जे.के.केमिकल नाला, रावळी लो लेवर नाला, कोरबा मिठागर नाला, प्रतीक्षानगर, सेमिंडा नाला, दिनबंधू नाला, सोमय्या नाला, शेख मिस्त्री नाला, खाऊ क्लिक रोड, वडाळा ट्रक टमिनस, आणिक वडाळा रोड,
जी/दक्षिण- एलपीजी नाला, टेक्स्टाईल मिल नाला, रेसकोर्स नाला, नेहरू सायन्स सेंटर नाला.
जी/उत्तर- नाईकनगर नाला, नाईकनगर ब्रँच नाला, प्रेमनगर नाला, शेठवाडी नाला, दादर धारावी नाला, कुट्टीवाडी नाला.
एल- बाह्मणवाडी नाला, कुर्ला, भारतीयनगर नाला उपनाला,भारतीय नगर नाला, अलिदादा नाला, सफेद पूल नाला, संजयनगर नाला, श्रमजीवी नाला, नाला क्रमांक १०, शिवाजी कुटिर आऊटफॉल, कारशेड नाला, मिठी नदी कुला पश्चिम,
एम/पूर्व- देवनाला नाला, मानखुर्द नाला, रफिकनगर नाला, डम्पिंग ग्राऊंड नाला, सुभाषनगर नाला, मानखुर्द नाला, देवनार नाला, पीएमजीपी नाला, पीएमजीपी नाला-देवनार, एनएडी नाला, पीएमजीपी नाला-गोवंडी, रफीनगर नाला, गायकवाड नगर नाला, वैभवनगर नाला, आदर्श नगर नाला, निरंकारी नाला
एम/पश्चिम- फर्टिलायझर नाला, अयोध्यानगर नाला, चरई नाला, वाशीनाका नाला, फर्टिलायझर नाला,
एन- वल्लभबाग नाला, गौरीशंकर वाडी नाला, सोमय्या नाला-घाटकोपर पूर्व, लक्ष्मीबाग नाला, सोमय्या नाला, बर्वे नगर नाला, सोमय्या नाला रेल्वे कल्व्हर्ट, गावदेवी नाला.
एस- टेक्नोवर्क नाला, उषानगर नाला, दातार कॉलनी नाला, ट्रान्समिशन नाला, क्रॉम्प्टन कांजूर नाला, कन्नमवारनगर नाला, अलाँग वेस्ट साईट मिठी.
टी- एसीसी नाला, नानेपाडा नाला, रामगड नाला, मोतीनगर नाला.
एच/पूर्व- वांद्रे मिठी नदी, वाकोला नदी, ओएनजीसी, मिठी नदी, चमडावाडी नाला, बेहरामपाडा नाला, गोळीबार नाला.
एच /पश्चिम- गझदरबंध नाला, बोरान नाला, हरिजन नाला.
के/पूर्व- अंधेरी पूर्व मिठी नदी, मोगरा नाला, मेघवाडी नाला, नवलकर नाला, जिजामाता
नाला, लेलेवाडी नाला, कृष्णनगर नाला, कार्गो नाला, शास्त्रीनगर नाला, श्रद्धानंद नाला, कोलडोंगरी नाला, चोखामेळा नाला, शास्त्रीनगर नाला आणि कोंडीविटा नाला.
के/पश्चिम- मीलन सबवे, नेहरूनगर नाला, रसराज नाला, कोलडोंगरी नाला, अभिषेक नाला, अल्फा कल्व्हर्ट, पत्रावाला चाळ, जीवननगर, स्टार बाजार, इंडियन ऑईल नाला, फेअरडिल नाला.
पी/दक्षिण- वालभट नाला, प्रेमनगर नाला, भगतसिंह नाला, मोतीलाल नगर.
पी/उत्तर- पुष्पापा पार्क आणि मालवणी नाला
आर/दक्षिण- पोयसर नदी प्रणाली
आर/मध्य- चंदावरकर नाला प्रणाली
आर/उत्तर- दहिसर नदी प्रणाली, धारखाडी नाला, काजूपाडा नाला, कोकणी पाडा नाला, यादवनगर नाला, अवधुतनगर नाला, केतकीपाडा नाला, तेरे कंपाऊंड नाला.