महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने आता ऑनलाईन कॅश कलेक्शन सिस्टीमचे वीजबिल भरणा केंद्र महावितरणाच्या मुख्य सव्र्हरशी जोडण्यास सुरुवात केली आहे.
वसई- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने आता ऑनलाईन कॅश कलेक्शन सिस्टीमचे वीजबिल भरणा केंद्र महावितरणाच्या मुख्य सव्र्हरशी जोडण्यास सुरुवात केली आहे. परंतु, ऑनलाईन वीजबिल भरणा करताना महावितरणाचे सव्र्हरच डाऊन होत असल्यामुळे वसई तालुक्यात ग्राहकांना त्याचा विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.महावितरण संस्थेने वीज ग्राहकांना चांगली व जलद सेवा मिळावी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील ऑनलाईन कॅश कलेक्शन सिस्टीम असलेली वीजबिल भरणा केंद्र महावितरणाच्या मुख्य सव्र्हरशी जोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिल भरणा केल्या नंतर लगेचच त्याची नोंद महावितरणाच्या कार्यालयात केली जाणार आहे.
ही सेवा १ ऑगस्टपासून महावितरणाच्या मुख्य सव्र्हरशी जोडण्यास टप्प्याटप्प्याने सुरुवात करण्यात आली आहे. परंतु ग्राहकांच्या सेवेसाठी ऑनलाईनप्रणाली महावितरण संस्था अवलंबित असली तरी या सेवेचा लाभ ग्राहकांना मिळण्याऐवजी मनस्ताप व वेळ वाया जात असल्यामुळे वीजग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेकदा मुख्य सव्र्हर डाऊन होत असल्यामुळे वसई तालुक्यातील अनेक वीज बिल भरणा केंद्रावर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात.
याउलट महावितरणकडून ग्राहकांच्या सेवेसाठी ऑनलाईन सिस्टीममध्ये बदल केला असून त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही वीजबिल भरणा केंद्रावरून ग्राहकांना बिल भरणे सोयीचे जाणार असल्याचे वसईचे अधीक्षक अभियंता अरुण पापडकर यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे सप्टेंबर महिन्याअखेपर्यंत तालुक्यातील ८१ वीजबिल भरणा केंद्र मुख्य सव्र्हरशी जोडली जाणार आहेत. सध्या या संगणक प्रणालीत काही त्रुटी असल्यामुळे मुख्य सव्र्हर डाऊन होण्याचे प्रकार घडत असले तरी याबाबत महावितरणाचे इंजिनीअर मुख्य संगणक प्रणाली कार्यान्वित ठेवण्यात लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती पापडकर यांनी दिली.
[EPSB]
चायनाटाऊन @ सॅन फ्रान्सिस्को
सॅन फ्रान्सिस्को आपल्या लज्जतदार पदार्थ, गोल्डन गेट ब्रिज, पियर ३९ आणि इतर खूप सा-या ऐतिहासिक गोष्टींकरिता प्रसिद्ध आहे. याशिवाय सॅन फ्रान्सिस्कोमधील चायनाटाऊन सांस्कृतिक जत्रा हे पर्यटकांकरिता एक अनोखी संधी देणारे पर्यटन स्थळ आहे. परदेशी ट्रिपचे विथ फॅमिली प्लॅन करीत असाल तर एक दिवस सॅन फ्रान्सिस्कोकरिता नक्की राखीव ठेवा..
[/EPSB]