‘जॉय’ राईड ठरलेली मोनो रेल सोमवारी पुन्हा चेंबूर भक्तीपार्कस्टेशनजवळ तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली.
मुंबई- ‘जॉय’ राईड ठरलेली मोनो रेल सोमवारी पुन्हा चेंबूर भक्तीपार्कस्टेशनजवळ तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. या घटनेमुळे मोनो रेल्वेच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण
झाले आहे.
चेंबूर ते वडाळा दरम्यान प्रवास करताना भक्तीपार्कस्टेशनजवळ सकाळी ६ वाजता मोनो रेल बंद पडली. त्यामुळे जवळपास ६ तास या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
सुदैवाने या घटनेच्या वेळी मोनो रेलमध्ये प्रवासी नव्हते. अखेर तांत्रिक कर्मचा-यांनी चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर मोनो रेल सुरू करण्यात यश मिळवले आहे. या बंद पडलेल्या मोनो रेलमधून चालकाला सुखरूप बाहेर काढले.
दरम्यान, गेल्या वर्षी याच ठिकाणी मोनो रेल बंद पडली होती. त्यावेळी अग्निशामक दलाने प्रवाशाना खाली उतरवले होते. सोमवारी पुन्हा मोनो बंद पडल्याने याच्या सुरक्षेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले.