भारताने अमेरिकेकडून १४५ अत्यंत हलक्या हॉवित्झर तोफा विकत घेण्यास मंजुरी दिली.
नवी दिल्ली- भारताने अमेरिकेकडून १४५ अत्यंत हलक्या हॉवित्झर तोफा विकत घेण्यास मंजुरी दिली. बोफोर्स प्रकरणानंतर तीन दशकानंतर पहिल्यांदाच या तोफांची खरेदी झाली. तसेच १८ धनुष्य तोफखाना गन्सचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी परिषदेच्या बैठकीत १८ प्रस्तावांवर चर्चा झाली. यात नवीन २८ हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावावर चर्चा झाली.
अमेरिकेडून १४५ अत्यंत हलक्या हॉवित्झर तोफा परदेशी लष्कर विक्री मार्गाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या तोफांच्या वाहतुकीचा खर्चही वाचणार आहे. भारताने अमेरिकन सरकारला स्वारस्य देकार पत्र पाठवले होते. अमेरिकन सरकारने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.