राज्य शासनातर्फे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिल्या जाणा-या सन २०१७-१८ च्या पुरस्कारासाठी जेष्ठ गायिका माणिक भिडे यांच्या नावाची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबई येथे केली.
मुंबई- राज्य शासनातर्फे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिल्या जाणा-या सन २०१७-१८ च्या पुरस्कारासाठी जेष्ठ गायिका माणिक भिडे यांच्या नावाची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबई येथे केली. प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणा-या कलाकारास हा पुरस्कार दिला जातो. ५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पं. केशव गिंडे, पं. नाथराव नेरळकर, श्रीमती कमलताई भोंडे या मान्यवरांच्या समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांची शिफारस केली होती. यापूर्वी हे पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं. जसराज, श्रीमती प्रभा अत्रे, पं. राम नारायण, श्रीमती परवीन सुलताना यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पंडिता माणिक गोविंद भिडे यांचा १९३५ साली कोल्हापूर येथे जन्म झाला. जयपुर – अत्रोली घराण्याशी त्यांची संगीत परंपरा जोडलेली आहे. बालवयापासून संगीताची आवड असलेल्या माणिकताईंना आई-वडीलांकडून अभिजात संगीत शिकण्यास प्रोत्साहन मिळाले.
[EPSB]
गुगलच्या १९ वा वाढदिवसानिमित्त डुडलमधून ‘सरप्राईज’
[/EPSB]