इनओर्बिट मॉलने व्यवसायाच्या उत्कृष्ट कल्पना असलेल्या महिलांना पाठिंबा देण्यासाठी असलेल्या पिंक पावर अभियानाच्या तिस-या आवृत्तीच्या समारोपाची घोषणा केली.
मुंबई- इनओर्बिट मॉलने व्यवसायाच्या उत्कृष्ट कल्पना असलेल्या महिलांना पाठिंबा देण्यासाठी असलेल्या पिंक पावर अभियानाच्या तिस-या आवृत्तीच्या समारोपाची घोषणा केली. या अभियानाचा समारोप इनऑर्बिट मॉल, मालाड मध्ये करण्यात आला. विजेत्यांचा निर्मात्या टिस्का चोप्रा, इनऑर्बिट मॉलचे असोसीएट व्हाईस प्रेसिडेंट, मार्केटिंग आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन पुनीत वर्मा आणि सेन्ट्रल बँकचे सतीश मुक्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पिंक पावरच्या तिस-या आवृत्तीत मुंबई, नवी मुंबई, बंगलोर, हैदराबाद आणि बडोदा येथून १४११ प्रवेशिका मिळाल्या होत्या.
विजेत्यांमध्ये अनुराधा अलुरकर (अ बिग इंडियन स्टोरी), अनुराधा नागपाल (धूपच्या संस्थापिका), मुंबई (मालाड) : निधी देशमुख (तत त्वम असी) दुस-या क्रमाकांच्या विजेत्या नेहल रायचा (काईट्स क्लोथिंग कं.), पूजा सुखीजा (रिकोडच्या संस्थापिका) उषा शिवरामकृष्णन (अस्त्र डिझाईन्सच्या संस्थापिका) सिमरन भेसीन आणि इव्ही चिन (ब्रॅगच्या संस्थापिका) वर्षा महेंद्र (डीजाईन आयडिज च्या संस्थापिका), मनवीन कौर (हॉबी इन बॉक्सच्या संस्थापिका), राकेशा शहा (व्होलाच्या संस्थापिका) यांचा समावेश आहे. इनऑर्बिट मॉलचे मार्केटिंग आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे उपाध्यक्ष पुनीत वर्मा या उपक्रमाविषयी म्हणाले की, इनओर्बिट मॉल महिलांच्या जिद्दीला सलाम करतो. पिंक पावर हा नवोदित महिला उद्योजकांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे व्यासपीठ आहे.
[EPSB]
मेडजीनोमला सीरिज सीफंडिंगमार्फत निधी उपलब्ध
जीनोमिक्स रिसर्च व डायग्नोस्टिक्स क्षेत्रातील अग्रणी कंपनीने सीरिज सी फंडिंगच्या माध्यमातून कॉग्निजेंटचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायणन यांच्याकडून ३ कोटी डॉलर निधी मिळविल्याची घोषणा केली.
[/EPSB]