चंद्रपूरची महाकालीदेवी विदर्भातील अनेकांचे कूलदैवत आहे.
चंद्रपूरची महाकालीदेवी विदर्भातील अनेकांचे कूलदैवत आहे. या देवीच्या नावावरूनच चंद्रपूरची ओळख आहे. महाकाली देवी ही पार्वतीचा अवतार असल्याचे मानण्यात येते. या मंदिरात कायम दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली असते. मात्र मंगळवारी गर्दी अधिक असते. चैत्र महिन्यात देवीची यात्रा असते. यावेळी विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून भावीक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
यात्रेच्या वेळी याठिकाणी धार्मिक उत्सावाबरोबरच वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमातून विदर्भातील विविध लोककलेचे दर्शन होते. त्याच्या अभ्यासासाठी लोककलेचे अभ्यासक या जत्रेला आवर्जून हजेरी लावतात. या देवीच्या दर्शनाने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या मागील संकटे दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. राणी हितवतीने या मंदिराचा जिर्णोद्धार अठराव्या शतक्यात केल्याची नोंद येथील एका शीलालेखावर आढळते.
[EPSB]
भारताकडून टॉमेटो खरेदीस पाकिस्तानचा नकार
[/EPSB]