कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने देशभरातील शेतक-यांची अवस्था बिकट असतानाच मध्य प्रदेशमधील एका शेतक-याने आपल्या पोटच्या पोरींना नांगराला जुंपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सेहोर- कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने देशभरातील शेतक-यांची अवस्था बिकट असतानाच मध्य प्रदेशमधील एका शेतक-याने आपल्या पोटच्या पोरींना नांगराला जुंपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बैल खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने या शेतक-याने मुलींना नांगर ओढण्याचे काम करण्यास सांगितले.
सरदार काहला असे या शेतक-याचे नाव आहे. मध्य प्रदेशमधील सेहोरच्या बसंतपूर पंगारी गावात यांचे कुटुंब राहते.
शेत नांगरण्यासाठी बैल खरेदी करण्याइतकी आणि त्या बैलांचे पोट भरण्याएवढी आर्थिक परिस्थिती नाही. घरातील परिस्थिती अतिशय बिकट असल्याने दोन्ही मुलींना शाळा सोडली आहे. शाळेत जात नसल्याने दोन्ही मुली शेतीच्या कामांमध्ये मदत करतात,’ अशी माहिती काहला या शेतक-याने दिली.
दरम्यान, प्रशासन याप्रकरणात लक्ष घालत असून संबंधित शेतक-याला सरकारी योजनेअंतर्गत योग्य मदत देण्यात येईल,’ असे माहिती जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी आशिष शर्मा यांनी सांगितले.