एका शेतक-याने बँकेतून काढलेल्या दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांवरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्रच गायब असल्याचा प्रकार मध्य प्रदेशातील शिवपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे.
भोपाळ- एका शेतक-याने बँकेतून काढलेल्या दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांवरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्रच गायब असल्याचा प्रकार मध्य प्रदेशातील शिवपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. लक्ष्मण मीना असे या शेतक-याचे नाव आहे.
त्याने शिवपूर, बरोडा शहर परिसरातील एका बँकेतून दोन हजार रुपयांच्या तीन नोटा ३ डिसेंबरला काढल्या होत्या. त्यावेळी या नोटांवर गांधीजींचे छायाचित्रच नव्हते, अशी माहिती मीना यांनी दिली.
ही बाब शेतक-याने बँक मॅनेजरच्या निदर्शनास आणून दिली. नोटा छपाईदरम्यान प्रिटिंग मिस्टेक झाल्याचा खुलासा बँकेतर्फे करण्यात आला.