लायन्स हेल्थ फाऊंडेशन चोंढी या ठिकाणी अत्याधुनिक फेको मशीन तसेच आय चेकअप चेअर युनिट व अल्पदरातील चष्मांच्या शोरूम या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
अलिबाग- लायन्स हेल्थ फाऊंडेशन चोंढी या ठिकाणी अत्याधुनिक फेको मशीन तसेच आय चेकअप चेअर युनिट व अल्पदरातील चष्मांच्या शोरूम या सुविधा उपलब्ध होणार आहेत. आधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी मुंबई व पुणे या ठिकाणी जावे लागते. अलिबागसह तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना स्वस्त दारात अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी लायन्स क्लब अलिबाग, मांडवा, पोयनाड व चेंबूर डायमंड मुंबई यांच्यातर्फे अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे लायन्स हेल्थ फाऊंडेशन सुरू करण्यात आले.
चोंढी येथे आता ज्येष्ठ नागरिक गजेंद्र दळी यांच्या सहकार्यातून फेको मशीन, रायगड जिल्हा परिषद कर्मचारी पतपेढी यांच्या सहकार्यातून आय चेक अप चेअर युनिट देणगी म्हणून देण्यात आले आहे. फेको मशीन, आय चेक अप चेअर युनिट व अल्पदरातील चष्म्याच्या शोरूमचे लोकार्पण चोंढी येथील लायन्स हेल्थ फाऊंडेशनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गजेंद्र दळी यांच्या हस्ते या सुविधांचे उद्घाटन करण्यात आले.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, माजी प्रांतपाल ला. अनिल जाधव, एमजेएफ ला. नितीन अधिकारी, जिल्हा परिषद कर्मचारी पतपेढीचे चेअरमन सुरेश म्हात्रे जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्या प्रियदर्शनी पाटील, ला. प्रवीण सरनाईक, अनिल म्हात्रे, महेंद्र पाटील, नयन कवळे, शुभदा कुडतडकर, मेडिकल ऑफीसर डॉ. राजपाल, अॅड. शिरीष लेले आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सहकार्य करणारे देणगीदार, शिबीर राबविण्यासाठी आर्थिक मदत करणा-यांचा लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या वतीने गौरव करण्यात आला.
[EPSB]
भगवानगडावर होणा-या दसरा मेळाव्याचा वाद यंदाही कायम आहे. गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा दसरा मेळाव्याला विरोध कायम आहे, तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक दसरा मेळाव्यासाठी ठाम आहेत.
[/EPSB]