उल्हासनगर महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी कल्याण बदलापूर रस्त्यावरील कोहिनूर एमएक्स या इमारतीतील अतिरिक्त बांधकाम काढून टाकण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त मनीष हिवरे याना दिले होते.
उल्हासनगर- उल्हासनगर महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी कल्याण बदलापूर रस्त्यावरील कोहिनूर एमएक्स या इमारतीतील अतिरिक्त बांधकाम काढून टाकण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त मनीष हिवरे याना दिले होते. त्यानुसार मंगळवारी दुपारी या बांधकामावर पालिकेने तोडक कारवाई केली.
उल्हासनगर शहरातून जाणा-या कल्याण-अंबरनाथ राज्य मार्गावर सुरू असलेल्या बांधकामांचा पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पाहणी दौरा केला होता. यावेळी कोहिनूर एन. एक्स. या फॉरवर्ड लाईन येथील इमारतीच्या दोन्ही बाजूला काढलेली दोन बेकायदेशीर दुकाने तोडण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त मनीष हिवरे यांना दिले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी मनीष हिवरे, प्रमोद पाटील, दिलीप भोईर, राजू कुलकर्णी, बापू सोनावणे, विनोद मोरे यांच्या पथकाने बांधकामांवर तोडक कारवाई केली.
[EPSB]
अरब शेखने नोकरांसाठीही खरेदी केले ७० कोटींचे घर
[/EPSB]