मुंबई उपनगर किकबॉक्सिंग संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेतील फाईटदरम्यान सोमय्या कॉलेजची विद्यार्थिनी कावेरी सिंगच्या डाव्या डोळय़ाला दुखापत झाली.
मुंबई- मुंबई उपनगर किकबॉक्सिंग संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेतील फाईटदरम्यान सोमय्या कॉलेजची विद्यार्थिनी कावेरी सिंगच्या डाव्या डोळय़ाला दुखापत झाली. जखमी खेळाडूवर प्रथमोपचार करण्यात आयोजकांनी टाळाटाळ केली, असा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे. सदर स्पर्धेवेळी कुठलीही वैद्यकीय सुविधा तसेच डॉक्टर उपलब्ध नव्हते, असे त्यांचे म्हणणे आहे.
शालेय किकबॉक्सिंग स्पर्धा रविवारी (१७ सप्टेंबर) भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) कांदिवली केंद्रात झाली. त्यावेळी फाईटदरम्यान प्रतिस्पर्धी खेळाडूचा जोरदार ठोसा लागल्याने कावेरीच्या उजव्या डोळय़ासह गालाला दुखापत झाली. त्यानंतर तिला डोळा नीटपणे उघडता येत नव्हता. त्यावेळी डॉक्टरही नव्हते. त्यामुळे तिला घरी पाठवण्यात आल्याचे कावेरीच्या पालकांचे म्हणणे आहे.
त्याच रात्री कावेरीला दोन उलटय़ा झाल्या. किकबॉक्सिंग मुंबई उपनगर संघटनेचे अध्यक्ष संतोष खंदारे यांनी जबाबदारी झटकल्याचेही पालकांनी म्हटले आहे. स्पर्धेच्या नोंदणीवेळीही (शनिवारी) अपु-या कागदपत्रांमुळे आयोजकांनी तिला प्रवेश नाकारल्याचाही आरोप पालकांनी केला आहे. शेवटी कॉलेजला जाऊन तिला कागदपत्रे पूर्ण करून द्यावी लागली, असे पालकांचे म्हणणे आहे
[EPSB]
[/EPSB]