सर्वोच्च न्यायालयाने केरळातील ‘लव्ह जिहाद’प्रकरणाची तुलना इंटरनेटवरील ‘ब्ल्यू व्हेल’ या जीवघेण्या खेळाशी केली आहे.
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने केरळातील ‘लव्ह जिहाद’प्रकरणाची तुलना इंटरनेटवरील ‘ब्ल्यू व्हेल’ या जीवघेण्या खेळाशी केली आहे.
‘इंटरनेटवरील ‘ब्ल्यू व्हेल’ गेममध्ये आवाहन केले जाते आणि त्यामध्ये त्यांना शेवटी आत्महत्या करावी लागते, त्याचप्रमाणे आजकाल कुणाचेही विशिष्ट हेतूसाठी मतपरिवर्तन करणे सहज शक्य आहे’, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
‘लव्ह जिहाद’ असो की ‘ब्ल्यू व्हेल’ गेम दोन्हीमध्ये व्यक्तिला मानसिकदृष्ट्या गुंतवूण ठेवले जाते. म्हणूनच त्याला ‘ब्ल्यू व्हेल सुसाइड गेम’ म्हणत असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या खंडपीठाने एनआयएला या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. एनआयए स्वतंत्र तपास यंत्रणा आहे. त्यामुळे त्यांनी केरळच्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील तथ्य समोर आणावीत.
केरळमधील ‘लव्ह जिहाद’ची ही घटना केवळ या भागापूरती मर्यादीत एकमेव घटना आहे की ही फार मोठी घटना आहे, याचा तपास करण्यात यावा, असेही आदेश देण्यात आले आहेत.