अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून बंडखोर आमदार कपिल मिश्रा यांनी ‘सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाय-काय’ या गाण्याचा आधार घेत केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा सडकून टीका केली.
नवी दिल्ली- केजरीवाल यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून बंडखोर आमदार कपिल मिश्रा यांनी ‘सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाय-काय’ या गाण्याचा आधार घेत केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा सडकून टीका केली. सध्या त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
आम आदमी पार्टीचे बंडखोर आमदार कपिल मिश्रा हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांच्या ४९ व्या वाढदिवसाच्या दिवशी ‘एके, तुला स्वतःवर भरोसा नाय काय?’, अशी टीका केली. ‘एके तुझी खुर्ची गोल’, असा हॅशटॅ्गचा वापर करीत हे गाणे ट्विटरवर शेअर केले. अरविंद केजरीवाल यांच्यासाठी बर्थडे-गिफ्ट, लवकरच संपूर्ण दिल्ली हे गाणे गाणार, असे कपिल मिश्राने ट्विट केले आहे.
व्हिडीओ पहाण्यासाठी येथे क्लिक करा
Birthday surprise for you @arvindkejriwal … Soon all Delhi will sing this for you ..Enjoy!!! #AKतेरीकुर्सीगोलhttps://t.co/XEZZE2KKzB
— Kapil Mishra (@KapilMishraAAP) August 16, 2017