महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय चिपळूण आयोजित राज्यस्तरीय भजन स्पध्रेत शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ कणकवलीने प्रथम क्रमांक मिळविला आहे.
कणकवली- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय चिपळूण आयोजित राज्यस्तरीय भजन स्पध्रेत शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ कणकवलीने प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर द्वितीय क्रमांककामगार कल्याण केंद्र, कुडाळ संघाने मिळविला. दिनांक ७ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी सप्ताहानिमित्त माधव सभागृह चिपळूण येथे ही स्पर्धा पार पडली. राज्यस्तरीय भजन स्पध्रेचा मान कणकवली खरेदी-विक्री संघाने मिळविला तर द्वितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र, कुडाळ, तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र, सावंतवाडी संघाला मिळाला.
सर्वोत्कृष्ट हार्मोनियम प्रथम व गायक तृतीय सुजित परब कणकवली, सर्वोत्कृष्ट पखवाज द्वितीय अवधुत राणे व तालसंचन तृतीय कणकवली अशी वैयक्तिक पारितोषिके मिळाली. स्पध्रेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे मिलींद कसबे शाखा प्रबंधक एलआयसी चिपळूण, रमेश शिलवंत, आगार व्यवस्थापक चिपळूण यांचे हस्ते झाला.
यावेळी शिवाजी शिंदे, संजय सुर्वे, तुषार घाग, संतोष शिंदे, सुहास करकरे, कामगार कल्याण अधिकारी समाधान भोसले इ. मान्यवर उपस्थित होते. शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे सहभागी कलावंत-सुजित परब, अवधूत राणे, लक्ष्मीकांत कुणकेरकर, राजकुमार पारकर, विश्वनाथ गवंडळकर, प्रशांत वाळवे, किशोर राऊत, विजय सावंत, दीपक राणे, हर्षद राणे, राजेंद्र सावंत, अरविंद परब सदर संघाचे शेतकरी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष-विठ्ठल देसाई व व्यवस्थापक अनिल सुखटणकर, संतोष नेवरेकर केंद्र संचालक कणकवली यांनी अभिनंदन केले.
[EPSB]
ज्या माणसाने महाराष्ट्राला अजरामर कविता दिल्या, ज्या माणसाने माणसाला निसर्गावर प्रेम करायला शिकवले, त्याच माणसाला आज आपले घर सोडावे लागले आहे.
[/EPSB]