छोट्या पडद्यावरील ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेमध्ये अनेकदा पोलिसांच्या भूमिकेत असलेला अभिनेता कमलेश पांडे यांनी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली.
भोपाळ- छोट्या पडद्यावरील ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेमध्ये अनेकदा पोलिसांच्या भूमिकेत असलेला अभिनेता कमलेश पांडे यांनी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली?, याचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.
मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे संजीवनी नगर परिसरात आपल्या राहत्या घरात कमलेशने स्वत:वर गोळी झाडून घेतली. यावेळी कमलेशची पत्नी आणि पत्नीची बहिण घटनास्थळी उपस्थित होत्या.
काही दिवसांपुर्वी कमलेशच्या पत्नीच्या बहिणीच्या मुलीचे लग्न झाले पण या लग्नाला कमलेशला बोलावले नसल्याने तो अस्वस्थ होता. त्यामुळेच त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मंगळवारी दारुच्या नशेत कमलेशने घरामध्ये गोंधळ घातला होता. त्यानंतर ही घटना घडली. या घटनेमुळे हादरून गेलेल्या त्याच्या कुटुंबियांनी तात्काळ डॉक्टर, रुग्णवाहिका बोलावली, मात्र त्या आधीच कमलेशचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.