ओरिफ्लेम इंडिया हा सौंदर्यप्रसाधनांच्या थेट विक्रीतील आघाडीचा स्वीडिश ब्रँड दीर्घकालीन परिणामांच्या दिशेने सातत्याने वाटचाल करत आहे.
ओरिफ्लेम इंडिया हा सौंदर्यप्रसाधनांच्या थेट विक्रीतील आघाडीचा स्वीडिश ब्रँड दीर्घकालीन परिणामांच्या दिशेने सातत्याने वाटचाल करत आहे. भविष्यातही या ब्रँडचा भक्कम वारसा आणि महत्त्वाकांक्षा याबद्दल अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कल्की कोचलिन हिला ओरिफ्लेमची ब्रॅण्ड अम्बेसेडर म्हणून नेमले आहे. अ ब्युटीफुल चेंज या बहुप्रतिक्षित कँपेनची सुरुवात ती करणार आहे. ओरिफ्लेमप्रमाणेच प्रत्येकजण या जगात एक सुंदर बदल घडवू शकतो, या कल्पनेवर या उपक्रमात भर देण्यात येणार आहे.
अनेक लोकांसाठी संधी निर्माण करणे आणि पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही, अशा जबाबदार पद्धतीने उत्पादनांची निर्मिती करून ओरिफ्लेम हा बदल घडवत आहे. यासंदर्भात ओरिफ्लेमचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक आणि दक्षिण आशियातील एसव्हीपी आणि प्रमुख सेरगेई कनाशिन म्हणाले, जगातील एक सर्वाधिक वेगाने वाढणारी कॉस्मेटिक कंपनी म्हणून आमचा विश्वास आहे की, सौंदर्य म्हणजे फक्त दिसणे नव्हे. सौंदर्य म्हणजे तुम्ही काय करता हे.
आमची उत्पादने ग्राहकांच्या आयुष्यात सौंदर्य आणि स्वास्थ्य आणतात. शिवाय, पर्यावरण आणि निर्सगाची कोणत्याही प्रकारे हानी होऊ नये, हे ध्यानात घेऊन त्यांची निर्मिती केली जाते. ओरिफ्लेम परिवारात आम्ही कल्की कोचलिनचे स्वागत करतो आणि तिच्यासोबतचे हे नाते फायदेशीर ठरेल, अशी आशा करतो. २०२० पर्यंत कार्बन उत्सर्जन ५० टक्क्यांनी कमी करण्याचे ओरिफ्लेमचे उद्दिष्ट आहे.
[EPSB]
[/EPSB]