मल्याळम, कन्नड आणि तामिळ सिनेमांतील प्रसिद्ध अभिनेत्री पार्वती आता इरफान खानसोबत आपल्या पहिल्याच हिंदी सिनेमांतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे.
मल्याळम, कन्नड आणि तामिळ सिनेमांतील प्रसिद्ध अभिनेत्री पार्वती आता इरफान खानसोबत आपल्या पहिल्याच हिंदी सिनेमांतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. करीब करीब सिंगल या तनुजा चंद्रा दिग्दर्शित सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. ऑनलाईन डेडिंग या सध्याच्या विषयावर आधारित या सिनेमांत इरफान खान आणि पार्वती यांच्या मुख्य भूमिका आहेत.
ऑनलाईन चॅटिंग करताना हे दोघे एकमेकांच्या संपर्कात येतात आणि मग त्यांच्या आयुष्यात जे काही घडते, त्याचे चित्रण या सिनेमात केले आहे. झी स्टुडियोद्वारा प्रदर्शित होणा-या या सिनेमाचे चित्रीकरण बिकानेर, ऋ षिकेश, गंगाटोक आदी ठिकाणी करण्यात आले आहे.