इंडियन प्रीमियर लीगच्या प्रक्षेपणाचे हक्क ‘स्टार इंडिया’ या कंपनीने मिळवले आहे. स्टार इंडियाने सर्वाधिक १६ हजार ३४७ कोटी रुपयांची बोली लावली आहे.
मुंबई- इंडियन प्रीमियर लीगच्या प्रक्षेपणाचे हक्क ‘स्टार इंडिया’ या कंपनीने मिळवले आहे. स्टार इंडियाने सर्वाधिक १६ हजार ३४७ कोटी रुपयांची बोली लावली आहे.
स्टार इंडियाला आयपीएल प्रक्षेपणाचे हक्क मिळाले आहेत. २०१८ ते २०२२ या पाच वर्षांसाठी स्टार इंडियाकडे आयपीएलच्या प्रक्षेपणाचे हक्क असतील.
या लिलावासाठी २४ कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. मात्र त्यापैकी १४ कंपन्या प्रत्यक्ष आर्थिक बोलीसाठी सज्ज होत्या. पण पात्रता फेरीत त्यापैकी एक कंपनी बाद झाली. उरलेल्या १३ कंपन्यांनी आयपीएलचे हक्क आपल्याला मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न केले होते.
या लिलावात सोनी, बी स्पोर्ट्स, सुपरस्पोर्ट, फॉलो ऑन, टाईम्स इंटरनेट, फेसबुक, एअरटेल, इको नेट, परफॉर्म ग्रुप, रिलायन्स जिओ अशा मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. डिजीटल हक्कांसाठी अमेझॉन, ट्विटर, डिस्कव्हरी, फेसबुक, एअरटेल यासारख्या दिग्गज कंपन्यांनी प्रयत्न केले.
या लिलावातून बोर्डाला २० हजार कोटी रुपये मिळतील असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात बोर्डाला १६ हजार कोटींवरच समाधान मानावे लागले. सोनी कंपनीची मक्तेदारी मोडत स्टारने बाजी मारली आहे.