दिल्लीतील ‘कनॉट प्लेस’ आणि मुंबईतील वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात ऑफिससाठी भाडय़ाने जागा मिळवण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते.
मुंबई- दिल्लीतील ‘कनॉट प्लेस’ आणि मुंबईतील वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात ऑफिससाठी भाडय़ाने जागा मिळवण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. प्रॉपर्टी सल्लागार कंपनी सीबीआरईनुसार, ऑफिससाठी जगातील सर्वात जास्त भाडे असलेल्या परिसरांच्या यादीत मुंबईत नरीमन पॉइंट हे ३० व्या क्रमांकावर आहे.
दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये प्रति वर्गफूट जागेचे वार्षिक भाडे ७ हजार रुपये आहे. गतवर्षी महागडय़ा ऑफिसच्या यादीत दिल्ली ९ व्या क्रमांकावर होते. तर मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात प्रति वर्गफूट जागेचे वार्षिक भाडे ५४०० रुपये आहे. तर नरीमन पॉइंट परिसरात ४१२२ रुपये मोजावे लागतात.
रिपोर्टनुसार, आंतरराष्ट्रीय पातळीवर दहा शहरांचा दबदबा कायम आहे. त्यात हाँगकाँग हे सर्वात महागडे आहे. हाँगकाँग सेंट्रलमध्ये प्रति वर्गफूट जागेसाठी वार्षिक भाडे २६९ डॉलर (१७२५६ रुपये) मोजावे लागते. बीजिंगमध्ये फायनान्स स्ट्रीटवर प्रति वर्गफूट जागेसाठी १७४ डॉलर वार्षिक भाडे मोजावे लागतले. हाँगकाँगमधील वेस्ट कोलून येथे १६४ डॉलर प्रति वर्गफूट वार्षिक असा दर आहे. टॉप फाइव्ह महागडय़ा ऑफिसेसमध्ये न्यूयॉर्कमधील मिडटाउन मॅनहट्टन आणि बीजिंगमधील सीबीडीचा समावेश आहे. टॉप २० मध्ये दिल्लीतील कनॉट प्लेससह मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सचा समावेश आहे.
[EPSB]
ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये शुक्रवारी सकाळी एका भुयारी रेल्वे स्थानकात स्फोट झाला आहे. भुयारी रेल्वे स्थानकात स्फोट होताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रवाशांची एकच धावाधाव सुरु झाली.
[/EPSB]